अध्यात्मिक

प्रवचन व किर्तनकारांसाठी आनंदाची बातमी : राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’, महिन्याला 5 हजार मिळणार, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रवचन व किर्तनकारांसाठी आनंदाची बातमी : राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’, महिन्याला 5 हजार मिळणार, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाबुलेटीन न्यूज । संभाजी देवकर
पंढरपूर : उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ :-
कोरोनाकाळात कीर्तने, प्रवचने बंद असल्याने छोट्या मोठ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर काही जणांना उपासमारीला देखील सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यात कीर्तनकार – प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज होती. अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत.

● थोरात-देशमुखाच्या बैठकीत ठरलं, :- कीर्तनकार-गायक-वादकांना प्रत्येकी 5 हजार रुपये वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना प्रत्येकी 5 हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहे. यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा स्त्युत्य निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या निर्णयाने कीर्तनकारांना दिलासा :-
सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आणि योग्य आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळालेला आहे.राज्यभरात असे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक आहेत, ज्यांची कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. पण सरकारच्या निर्णयाने त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

● कोरोनाच्या लाटांवर लाटा :-
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली. हजारो जणांचे जीव गेले. शासन प्रशासन कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. मात्र लोकांनीही शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहेत. श्रावण महिना सरलाय. आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशा काळात गर्दी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसंच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत आहेत.
(5 thousand rupees to be given to kirtankars between Corona period decision of Thackeray government)

● याबाबत वारकरी सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय सहकार्याध्यक्ष हभप. भरतमहाराज थोरात म्हणाले, “ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय वारकरी संप्रदायासाठी स्तुत्य आहे. कोरोना काळात सर्व प्रकारचे धार्मिक कार्यांवर बंधने आल्याने कीर्तन व प्रवचन सेवा बंद झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील प्रवचनकार, कीर्तनकार, गायक व वादक यांच्यावर आर्थिक संकट ओढवले असताना ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे वारकरी संप्रदायाला मोठा दिलासा मिळाला आहे.”
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.