महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : पुण्यातील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज परत खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी धमकावून दोन ते अडीच महिने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत सहा नराधमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आणखी तीन जण फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या घुमटकर ( वय वर्ष २९ ), आकाश शिंदे ( वय वर्ष २१ ), सुरज रोडे ( वय वर्ष २४) अशी अटक करण्यात करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर परेश ढमाले, अवधूत कणसे, साईनाथ मुळक हे फरार झाले आहेत. याबाबत पीडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
आरोपींना पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार केले आहेत. यातील संशयित आरोपी सोन्या घुमटकर याने धमकी देऊन जबरदस्तीने पीडित मुलीवर आपल्या पाच मित्रांबरोबर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पीडित मुलीला धमकावून जबरदस्तीने शारीरिक संबंध करून लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने ही बाब आईला सांगितल्याने या घटनेला वाचा फुटली. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्यादी दिली होती.
याबाबत पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ गुन्हा दाखल करून सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, सुरज रोडे यांना अटक केली आहे. परेश ढमाले, अवधूत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे पुढील तपास करीत आहेत. मागील आठवड्यात पुण्यात १४ वर्षीय मुलीवर अशीच बलात्काराची घटना घडली, त्यामुळे जिल्हात खळबळ माजली होती. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात राजगुरुनगर येथे घटनेची पुनरावृत्ती घडल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
००००
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.