महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील बाजारपेठेतील एका ६० वर्षीय जेष्ठ नागरिकाने कोरोनाचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने हाताची नस कापून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर असे आत्महत्या केलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, त्यांची पत्नी व त्यांना २३ जुलै रोजी केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना संसर्ग झाल्यामुळे दोघांनीही पुण्यातील एका खासगी रुग्णालयात १५ दिवस उपचार घेतेले. उपचार घेतल्यानंतर चार ऑगस्टला ते घरी आले असता त्यांनी होम क्वारंटाईन करून घेतले. त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने त्यांनी आपल्या हाताची नस धारदार सुरीने कापून आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी ( दि. ७ ) रोजी त्यांचा पुन्हा स्वाब घेऊन त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांनी हे कृत्य केले. आज ( दि. ८ ) सकाळी त्यांचा मुलगा त्यांना झोपेतून उठवायला गेला असता ही घटना उघडकीस आली. राजगुरूनगर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.