गुन्हेगारी

शिरोलीच्या डोंगरावर दोन तरुणांचा निर्घृण खून

परिसरात खळबळ, घटनास्थळी आढळल्या धूम्रपानाच्या वस्तू
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
राजगुरूनगर :
शिरोली ( ता.खेड ) येथील खापरदरा डोंगरावरील माळरानावर दोन अज्ञात तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केला असल्याची घटना आज ( दि. ८ ) सकाळी उघडकीस आली आहे. एका तरुणाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर व दुसऱ्या तरुणाच्या हातावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसून आले आहे.

खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी राजगुरूनगर पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. खुनामागचे नेमके कारण अद्याप काय आहे याचा पोलीस पथकाकडून शोध चालू असून या मृत तरुणांची अद्याप ओळख पटलेली नाही. आज सकाळी एक गुराखी खापरदरा या डोंगरावर गुरे चारण्यासाठी गेला असता हि घटना उघडकीस आली. दोन तरुणांचा एकाच वेळी खून झाल्याने त्यांच्यासोबत आणखी काही व्यक्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावर धूम्रपान केल्याच्या वस्तू आढळल्या असून या खुनाचे कारण व खून करणाऱ्यापर्यंत पोहचणे हे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांपुढे आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

6 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

1 day ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

5 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.