महाबुलेटिन न्यूज
राजगुरूनगर : ” मुर्ती संकलन व विसर्जन ऊपक्रम ” करोना च्या संकटकाळात राजगुरुनगर शहरात दिवसेंदिवस पॉझिटिव रुग्ण दररोज शेकडोने आढळत आहेत, त्यात गणेश उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करत असताना मात्र गणेश विसर्जनाच्या स्थळावर गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातून करोना संसर्ग वाढण्याचा मोठा धोका दिसत आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी चंद्रमा गार्डन, वाडा रोड, राजगुरुनगर येथील राजे शिवछत्रपती मित्र मंडळाने ” मूर्ती संकलन व विसर्जन ” या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मंडळाचे ठराविक स्वयंसेवक कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन मूर्ती संकलन करणार आहेत व सर्व मूर्ती एकत्रितरीत्या विसर्जित करणार आहेत, जेणेकरून गर्दीला आळा बसणार व संसर्गाचा धोका टाळता येईल वाडा रोड येथील सर्व व नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी मंडळाने ठराविक संपर्क क्रमांक यांची प्रसिद्धी करून नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेने देखील मंडळाच्या या उपक्रमास सावधानता बाळगत कार्य करावे अशी परवानगी दिली आहे. उपक्रमासाठी सर्व यंत्रणा मंडळाने सज्ज केली आहे व नागरिकांना उपक्रमास प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्याात आले आहे.
योगेश पवार(९७६६४०४०३६).
अमित घुमटकर(९२२६९००००९)
संतोष भांगे(९९२११०२९५३)
विकी खैरनार(८८०५१८१५५८)
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.