राजगुरूनगर : कोरोनाचे संक्रमण राजगुरूगरमध्ये झपाट्याने वाढत असल्यामुळे राजगुरूनगर येथे २४ तारखेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय झाला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २४ तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश राजगुनगर परिषेदेने दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने वगळता पूर्णपणे बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मेडिकल व दवाखाने सुरू राहणार असून शेती संदर्भातील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा घरपोच मिळणार असून नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती नगरपरिषदेकडून करण्यात आली आहे. संचार बंदी लागू असताना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.