महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : उद्या आखाड ( आषाढ ) महिन्यातला शेवटचा रविवार ( दि. १९ ) असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या किराणा दुकानांसह खास करून चिकन, मटण, मासे, अंडी खाणाऱ्या खवय्यांसाठी किरकोळ व ठोक विक्री करणारी सर्व दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत, असा आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे.
कोविड साथीच्या रोगाच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी हि सर्व दुकाने दि. १४ जुलै ते १८ जुलै २०२० दरम्यान बंद होती. सतत पाच दिवस दुकाने बंद राहिल्याने पुढील कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा होण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हि दुकाने रविवारी चालू ठेवण्यात आली आहेत. व्यवसाय धारकांनी नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून विक्री होण्यासाठी पूर्वी दिलेल्या निदेशाप्रमाणे उपाय योजना करावेत. यात हयगय केल्यास व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.