कोरोना

पुणे विभागात कोरोना बाधित 1 लाख 13 हजार 716 रुग्ण

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के : विभागीय आयुक्त सौरभ राव
महाबुलेटिन नेटवर्क
पुणे  :- विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 716 झाली आहे.  ॲक्टीव रुग्ण 39 हजार 145 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के आहे.  मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के इतके आहे.
         पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 393, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 387, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 68, कॅन्टोंन्मेंट विभागातील 75, व ग्रामीण क्षेत्रातील 161 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे.
         आयुक्त यांनी दिलेल्या महिनुसार कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 133 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 17, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 185, सांगली जिल्ह्यात 179 तर कोल्हापूर जिल्ह्यात 607 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
    सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 228 रुग्ण असून 2 हजार 128 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 46 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 215 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 320 आहे. कोरोना बाधित एकूण 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
         सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 905 रुग्ण असून 880 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 938 आहे. कोरोना बाधित एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 7 हजार 144 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 67 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 886 आहे. कोरोना बाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 4 हजार 474 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 716 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. अशापद्धतीने आकडेवारी विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

16 hours ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

2 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

3 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

9 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

9 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.