प्रशासकीय

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पुणे-नासिक राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात, ६५० कोटींचा निधी मंजूर…खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश..मार्च अखेर होणार कामाला सुरुवात

● केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा ग्रीन सिग्नल, डॉ. कोल्हे यांना पाठविले पत्र,
● मोशी इंद्रायणी नदी ते चांडोली १७/७०० किमी रस्त्याचे होणार सहा पदरीकरण
● चाकण चौकात सव्वादोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल
● चाकण व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, औद्योगिक वाहतूक होणार सुरळीत
● भीमाशंकर, शिर्डी, नासिक धार्मिक स्थळांना पोहोचणे होणार सुकर
● मार्च २०२१ अखेर होणार प्रत्यक्ष कामाला सुरुवात

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देेेवकर 
 चाकण : राष्ट्रीय महामार्ग ६० (जुना ५०) वरील इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या टप्प्यातील १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून चाकणचा तळेगाव चौक आणि एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची प्रतिक्रिया शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना पत्राद्वारे कळविले असून त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या ट्विट करण्यात आले आहे.

चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे निवडणुका पार पडल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमवेत बैठका घेतल्या. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्री पवार यांची शिष्टाई आणि डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू केली. सुमारे ६४८.८४ कोटींच्या या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२१ असून १८ जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्याची भूमिका डॉ. कोल्हे यांनी लावून धरल्यामुळेच चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून या पाठोपाठ नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची लवकरात लवकर निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांची कामे हा माझा प्राधान्याचा विषय असून राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने तळेगाव-चाकण आणि पुणे-नगर रस्ता हे दोन अतिशय महत्त्वाचे असणारे रस्ते येत्या काही काळात आपण मार्गी लावणार आहोत असे सांगून डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री पवार आणि केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

6 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.