महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : देशभरात आज ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांचे हस्ते घोडेगाव पोलीस स्टेशनला ISO 9001-2015 स्मार्ट पोलिस स्टेशन A++ ग्रेड पुणे जिल्ह्यातील सर्वोत्तम पोलिस स्टेशन म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
पोलिस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस विभागाचा स्मार्ट पोलिसिंग उपक्रम उपयुक्त ठरेल. कोरोनाच्या संकटकाळात पोलिस बांधव मोठ्या जिद्दीने, धैर्याने रस्त्यांवर उतरून काम करत आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांनी त्यांना दिलेली साथ ही महत्वाची आहे. त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. समाजाच्या भल्यासाठी पोलिस कोरोनाच्या कालावधीत कोरोना विरुद्ध लढले. आपण सर्व मिळून कोरोनाची ही लढाई जिंकू, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील पोलिस स्टेशनच्या इमारतींबरोबरच आधुनिक सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलिस विभागाच्या स्मार्ट पोलिसिंग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, पुणे विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, पोलिस अधिक्षक श्री. संदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. प्रदीप पवार व मान्यवर उपस्थित होते.
——
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.