पुणे: पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची बदली झाली आहे. त्यांची दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यानंतर चार वर्षांसाठी अथवा पुढील आदेश येईपर्यंत असेल. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नवलकिशोर राम यांची कारकीर्द उत्तम राहिली. कोविड च्या काळात त्यांनी जिल्हा आणि शहरात चांगली यंत्रणा राबवली.
फेम इंडिया मासिक व आशिया पोस्ट यांनी केलेल्या पाहणीत पन्नास जिल्हाधिकाऱ्यांमधून नवलकिशोर राम यांची निवड झाली होती. लोकाभिमुख प्रशासन ही त्यांची कामाची पद्धत राहिली. बीडचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांची कारकीर्द लोकांच्या लक्षात राहिली.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा