महाराष्ट्र

सार्वजनिक ग्रंथालयांच्या थकीत अनुदानासाठी ३० कोटी ९३ लाख रुपये मंजूर

महाबुलेटीन न्यूज / किशोर कराळे
मुंबई : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील देय थकित अनुदानासाठी ३० कोटी ९३ लाख ,७५ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
सामंत म्हणाले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास वितरित व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांना मान्यता देण्यात आली आहे.
तसेच सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात कला व संस्कृती, सार्वजनिक ग्रंथालये, मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालय यांना सहाय्यक अनुदानासाठी १२३ कोटी ७५ लाख रुपये एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला.
सार्वजनिक ग्रंथालयांना मागील वर्षाचे थकित अनुदान ३२ कोटी रूपये देण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी कृती समितीची दिनांक १२ जुलै २०२० रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून अनुदान वितरित करण्याबाबत श्री. सामंत यांनी विनंती केली होती. वित्त विभागाने मंजूर तरतुदीच्या २५% म्हणजे ३०.९३ कोटी अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी जारी करण्यात आला.
admin

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.