सामाजिक

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबुलेटीन न्यूज / हेमंत रणपिसे
मुंबई : पदोन्नती मध्ये आरक्षण हा दलित आदिवासी सह इतर मागासवर्गीयांच्या घटनात्मक अधिकार आहे असे सांगत सर्वोच्च न्यायालयाकडुन पदोन्नतीमधील अरक्षण प्रकरणी योग्य न्याय मिळेल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला.येत्या दि. 21 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मधील अरक्षणाच्या प्रश्नावर निकला येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर आज ना. रामदास आठवले यांनी पदोन्नतीमधील आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार असल्याचे प्रसिद्धीस  दिलेल्या पात्रकात म्हंटले आहे.
नोकर भरतीमध्ये अनुसूचित जातींना 15 टक्के आणि अनुसूचित जमातींना 7. 50 टक्के आरक्षण लागू होते। त्यानुसार पदोन्नती मध्ये ही दलित आदिवासी आणि ओबीसींना आरक्षण तत्व लागू झाले पाहिजे. याबाबत सन 1995 मध्ये झालेल्या 82 व्या घटना दुरुस्ती नुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार  राज्य सरकारला प्राप्त झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने मागील निकालात पदोन्नतीमधील आरक्षण हे राज्य सरकार च विवेकावरअवलंबून आहे  असे म्हंटले होते. पदोन्नती मधील आरक्षणाबाबत आगामी 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निकालात पदोन्नती मधील आरक्षणाबाबत अंतिम निकाल लागू शकतो. आणि या निकालातून पदोन्नतीतील आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार असल्याबाबत शिक्केमोर्तब होईल असा विश्वास  ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

4 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.