पुणे जिल्ह्यात कोरोना बधितांनी केला ५० हजाराचा टप्पा पार

पुणे विभागातील ३७ हजार ३५१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील ३७ हजार ३५१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६० हजार ६७५ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण २१  हजार ५१३ आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण १ हजार ८११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८८२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ६१.५६ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.९८ टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयात 50 हजार 46 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ३१ हजार ८९७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव रुग्ण संख्या १६ हजार ८६२ आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रात ११ हजार ६५१, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ४१८ व पुणे कॅन्टोंन्मेंट २३६, खडकी विभागात ४७ , ग्रामीण क्षेत्रात १ हजार ४३०, जिल्हा शल्य चिकीत्सक  यांच्याकडील ८० रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण १ हजार २८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ९५५, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १८९ व पुणे कॅन्टोंन्मेंट २९, खडकी विभागातील २३, ग्रामीण क्षेत्रातील ६१, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील २९ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ६८८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण ६३.७४ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण२.५७ टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण २ हजार ५७७ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १ हजार ८५४, सातारा जिल्ह्यात ६४, सोलापूर जिल्ह्यात ३२४, सांगली जिल्ह्यात ५४ तर कोल्हापूर जिल्ह्यात २८१ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत २ हजार २७८ रुग्ण असून १ हजार २८५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या ९१४ आहे. कोरोनाबाधित एकूण ७९  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील ५ हजार २६५ कोरोना बाधीत रुग्ण असून २ हजार ७५५ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २ हजार १४० आहे. कोरोना बाधित एकूण ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत ९४५ रुग्ण असून ४३० बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ४८६ आहे. कोरोना बाधित एकूण २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील २ हजार १४१ कोरोना बाधीत रुग्ण असून ९८४ बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १ हजार १११ आहे. कोरोना बाधित एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण २ लाख ९६ हजार १९६ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी २ लाख ९१  हजार १७६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  ५ हजार २० नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी २ लाख २९ हजार ७८१ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून ६०  हजार ६७५ नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 19 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.