दुनिया अनमोल रत्नांची : निलम,आहे मनोहर तरी……

नमस्कार,
प्रत्येक लेखानंतरचा आपला मिळणारा प्रतिसाद मनाला आनंद देणारा आहे. श्रावण सुरु होतोय.सणांचा महिना म्हणून श्रावणाची ओळख आहे.या मंगलमय महिन्याच्या सुरुवातीला मनोहर दिसणारा पण तरीही मनात शंकेची पाल चुकचूकवणारा निलम या रत्नाबद्दल आपण आज माहीती घेऊया……
             निलम हे अतिशय मौल्यवान रत्न समजले जाते. दिसायला अतिशय मोहक असे हे रत्न आहे.निळा रंग विषेशतः स्त्रियांना अतिशय आवडतो. परंतू निलम हे शनीचं रत्न असल्यानं शक्यतो सबुरीनेच त्याच्या वाट्याला जातात.ते ही गुरुजींच्या सल्ल्यानुसारच. नाहीतर नाही. मला कायम असं वाटत आलंय शनी महाराजांनी निलम सोडून दुसरे एखादे रत्न स्वतः साठी निवडले असते तर किती छान झाले असते.केवळ शनीचे रत्न म्हणून दुर्लक्षित झालेला निलम  मला कायम हळवा करुन जातो. निलम मँनमार, भारत आणि श्रीलंकेत प्रामुख्याने सापडतात. ( हल्ली बँकाँक चे निलम देखील बाजारात मिळतात पण क्वालिटीच्या मानाने ते अतिशय हलके असतात आणि किंमतही साधारण १०० ₹ पर कँरेट ) आमच्या रत्नशास्त्रात सिलाँन निलम अतिशय सुंदर समजले जातात. या  निलमच्या आरपार प्रकाश परावर्तित होतो.खनिजांच्या संयुगांपासून निलम या रत्नाची उत्पत्ती होते.संस्कृत मध्ये याला सौरीरत्न संबोधतात. तर इंग्रजी मध्ये ब्लु सफायर म्हणतात.या रत्नाचा एक भाऊ पण आहे पण त्या भावाची ओळख मात्र पुढील लेखात करुन देईल.
निलम कसा ओळखावा : पारदर्शी, काठीण्य आणि मोरपंखी निळा रंग असलेला निलम सर्वश्रेष्ठ मानला जातो. असा निलम ओळखणे अगदी सोपे आहे.हा निलम दुधात ठेवून पहावा दुधाला निळसर झाक आली की समजावे निलम चांगला आहे. किंवा निलम पाण्यात ठेवला असता पाणी देखील निळसर दिसू लागते. इतके प्रभावशाली आहे हे रत्न.
             आयुर्वेदात निलमला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोळ्यांचे विकार असणारांनी, मानसिक ताण येणाऱ्या लोकांनी, निद्रानाश असणारांनीही निलम वापरावा. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा दुष्परिणाम संपविणारे हे रत्न आहे.धनसंपत्तीचे होत असणारे नुकसान थांबविणारे हे रत्न आहे.मनशांती मिळवून देणारे हे रत्न आहे.आणि जर साडेसाती असेल तर त्याचा प्रभाव कमी करणारे हे रत्न आहे असं म्हणतात.
              मला अनेकदा असं विचारलं जातं माझ्या राशीनुसार मला निलम वापरायला हवा पण शनीचा खडा कसा काय वापरावा ? काही अघटित घडले तर….? यावर मी तरी काय उत्तर देणार सांगा. मला वाईट एकाच गोष्टीचे वाटत राहतं इतके देखणे रत्न असून देखील केवळ शनी महाराजांच्या सानिध्यात आल्याने उपेक्षित राहिले आहे. ( आणि मग नेहमीप्रमाणे गुरुजींशी चर्चा करुन रत्न वापरा एवढंच सांगतो. )
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

3 hours ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

1 week ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

This website uses cookies.