संतापजनक! भूतदया नावाचा काही प्रकार आहे की नाही? अधिकारी उठले पक्षांच्या जीवावर…

महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : एका मुर्खपणाच्या निर्णयाने पक्षांचा ऐन विणीचा काळ असताना खेड वनखाते कार्यालय परिसरातील झाडे छाटली गेली. ही छाटणी पक्षी आणि पिलांच्या जीवावर उठली. अनेक पक्षांचे, पिलांचे जीव गेले तर अनेक जखमी झाले. झाडे छाटणीचा निर्णय घेणाऱ्यांना त्या मुक्या जीवांचे ना सोयर ना सुतक. पक्षीमित्रांच्या रेस्क्यू टीमने अनेक पक्षांचे जीव मात्र वाचवले.
           मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी ही वृक्ष छाटणी रेस्क्यू टीम व काही सुजाण नागरिकांच्या लक्षात आणून दिली.  तहसील कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय,  सार्वजनिक बांधकाम कार्यालय, वन खाते, टपाल कार्यालय, नगरपरिषद इत्यादी कार्यालये असणाऱ्या परिसरातील झाडांची छाटणी करण्यात आली. ऐन पावसाळ्यात आणि पक्षांच्या विणीच्या काळात हे वृक्ष छाटणीचा निर्णय मुर्खपणणाचा आणि पक्षांच्या दृष्टीने जीवावर बेतणारा ठरला.
या छाटणीने काय घडले?
अनेक पक्षी,पक्षांची पिले घरट्यांसह खाली पडले.
काही पक्षी व  पीले तडफडत होती तर काही दगावली
कोणी पुढाकार घेतला हे मुके जीव वाचविण्यासाठी?
पत्रकार सुनिल थिगळे, चेतन गावडे,  नागेश थिगळे यांच्यासह अनेक सर्पमित्र व प्राणीमित्र रेस्क्यू टीम
तेथे काय चित्र होते?
खूप लहान पिल्ले जमिनीवर पडली होती बरीच पिल्ले मेली होती.   राजगुरुनगर रेस्क्यू टीम सोबत संवाद साधला गेला. नेहमीप्रमाणे लगेच  पूर्ण टीम तिथे आली. सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जवळपास १०३ पिल्ले सापडली. ती बगळा आणि पानकावळा यांची लहान पिल्ले होती. ती सर्व जमिनीवर इकडे तिकडे झाडांच्या फांद्या खाली पडली होती. आणि मेलेली पिल्ले पण जवळपास ५० होती. परंतु सगळ्या सोईसुविधा उपलब्ध नसल्याने,  रेस्क्यू टीम मधील सदस्यांनी पुण्यामधील वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम (NGO) सोबत संपर्क साधला. एक तासातच पुण्यातील टीम त्यांची गाडी घेऊन डॉक्टरांसोबत खेडला फॉरेस्ट ऑफिस जवळ पोहोचले.  येथे आल्यावर त्यांच्या डॉक्टरांनी सर्व पिल्लांना लसीकरण केले. व सर्व पिल्ले ताब्यात घेतली. व त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेले.
यानिमित्ताने काही प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांचे…
पावसाळा असताना झाडे पाडली का?*
परवानगी कोणी दिली?
वनविभागाने दुर्लक्ष का केले?
लाॅकडाऊन असताना कामगार यांना परवानगी कोणी दिली?
वनविभागाने त्या पक्षांना उपचार का दिले नाही?
प्रशासन एवढ बेजबाबदार का?
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.