इंदापूर

राज्यमंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये : हर्षवर्धन पाटील

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मैदानावर खेळलेल्या सूरपाट्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोरोनाच्या संकटकाळात पोरकटपणाने वागून, स्टंटबाजी करत जनतेच्या जीवाशी खेळू नये, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज ( दि.२८ जुलै ) प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत चालला आहे. रुग्णांच्या संख्येने १२५ चा आकडा पार केला आहे. संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यात प्रभावी उपाययोजना राबवली जाणे अत्यावश्यक आहे. इंदापूर येथील कोविड सेंटरमध्ये व्हेंटीलेटर व उपचाराची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे महत्वाचे आहे. भिगवण व इतर आवश्यक त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारणे, कोरोनाग्रस्तांचा शोध, चाचणी व उपचाराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यातील इतर मंत्री, लोकप्रतिनिधी यासंदर्भात बैठका, दौरे काढून प्रभावी उपाययोजना करत आहेत. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री गर्दीत सूरपाट्या खेळून, स्वतःचे छायाचित्र असलेले पतंग उडवून स्टंटबाजी करीत आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
इंदापूर तालुक्यात युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. युवकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांच्याबरोबर सूरपाट्या खेळणे अथवा पतंग उडवण्याऐवजी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम राज्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे, असे प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षात युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील युवक अडचणीत सापडला आहे, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी
केला आहे.
मंत्रीपदावरील व्यक्तीने बेजबाबदारपणे न वागता कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे आवश्यक असते. पोरकटपणे वागणे हे इंदापूर तालुक्याच्या संस्कृतीला धरून नाही. इंदापूर तालुक्यात लोकांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काळजी व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सतत स्टंटबाजीची सवय असलेल्या इंदापूरच्या राज्यमंत्र्यांनी स्टंटबाजी टाळावी. शासकीय पातळीवरुन लोकांना मदत करून दिलासा द्यावा, असा सल्ला प्रसिद्धीपत्रकात पाटील यांनी दिला आहे.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.