महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि बीयुजे या संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली. राज्यात १४२ पत्रकार कोरोनाचे शिकार ठरले असताना देखील सरकार पत्रकारांच्या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची बाब ही शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. . “पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू” असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.
पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील हल्ले, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण, मुंबईतील पत्रकारांना लोकलमधून प़वास करण्याची सुविधा आदि विषय देखील शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या कानावर घातले आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आपण लक्ष घालावे, अशी त्यांना विनंती केली.
शिष्टमंडळात एस.एम.देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, बीयुजेचे जॉइन्ट सेक्रेटरी सुरजसिंह ठाकूर आदि सहभागी झाले होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, दीपक कैतके उपस्थित होते. पत्रकारांच्या वरील संघटनांनी यापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे.
यावेळी एस. एम. देशमूख यांनी ‘संघर्षाची पंच्याहत्तरी’ हे मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास सांगणारे तसेच ‘कथा एका संघर्षाची’ ही दोन पुस्तके शरद पवार यांना भेट दिली.
०००००
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…
महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…
This website uses cookies.