गुन्हेगारी

सासऱ्याने केले सुनेवर चाकूने वार… सून गंभीर जखमी.. ● चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सासऱ्याने केले सुनेवर चाकूने वार… सून गंभीर जखमी..
● चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

महाबुलेटीन न्यूज
चाकण : संतोष नगर ( ता. खेड ) येथे सासऱ्याने सुनेवर लोखंडी सुरीने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. सुनेवर हल्ला करून मोटार सायकलरून पसार झालेला सासरा पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळला आहे. सासरा आणि सून या दोघांवरही चाकण येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सासऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राधिका येवले ( रा. संतोषनगर, वाकी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे ) असे हल्ला झालेल्या सुनेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम दगडू येवले ( वय ७५ वर्षे ) असे सासऱ्याचे नाव आहे. 

पोलिसांना घटनास्थळी लाकडी मुठीची लांब पात्याची सुरी मिळाली आहे. राधिका आणि सासरा पुरुषोत्तम या दोघात मागील अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. राधिका हिला घरात राहूच द्यायचे नाही, या कारणावरून तिला सासरा पुरुषोत्तम हा त्रास देत होता. बुधवारी (१६ जून) सकाळी राधिका ही घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता सासरा पुरुषोत्तम हा सुनेला जीवे मारण्याच्या हेतूने पाठलाग करत गच्चीत गेला. त्यावेळी तेथे त्याने तिच्या मान, हात, गाल आणि पायावर लोखंडी सुरीने सपासप वार केले.

या हल्ल्यात सून राधिका ह्या गंभीर जखमी झाल्या. सासऱ्याच्या तावडीतून सुटत राधिका गच्चीवरून खाली धावत आल्या. पाठोपाठ सासराही खाली धावत आला. आणि दुचाकीवरून पसार झाला. शेजाऱ्यांनी जखमी राधिकाला तात्काळ रुग्णालयात हलविले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 day ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

4 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.