महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : ‘वरुण राजाची कृपादृष्टी कायम इंदापूर तालुक्यावर राहू दे. माझ्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरचे हसू सदैव फुलू दे’ अश्या शब्दात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी सोमवारी ( दि.३१ ऑगस्ट) देवाजीची करुणा भाकली. दहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पळसदेव येथील पाझर तलावाचे जलपुजन माने यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी हा आशीर्वाद मागितला. मेघराज कुचेकर, अनिल खोत, सुजित मोरे, दत्तात्रय शेलार, सतीश मोरे, सुनिल कणके, पळसदेवचे ग्रामस्थ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इंदापूर तालुका पावसाच्या बाबतीत तसा कमनशिबी आहे. सतत दुष्काळ अनुभवणा-या या भागात बहुतेक वेळा परतीचा पाऊस मदतीचा हात देतो. यंदा पावसाने चांगलीच कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ऑगस्टअखेर पळसदेवचा पाझर तलाव पाण्याने भरला. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हे घडले.
या पाण्यामुळे पळसदेवसह मराडवाडी व रुई येथील शेतीच्या पाण्याची उणीव दूर होणार आहे. पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
—–
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.