पुणे जिल्हा

पळसदेव पाझर तलावाचे जलपुजन

 

वरुण राजाची कृपादृष्टी असावी : जि. प. सदस्य प्रवीण माने

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : ‘वरुण राजाची कृपादृष्टी कायम इंदापूर तालुक्यावर राहू दे. माझ्या शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरचे हसू सदैव फुलू दे’ अश्या शब्दात जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी सोमवारी ( दि.३१ ऑगस्ट)  देवाजीची करुणा भाकली. दहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या पळसदेव येथील पाझर तलावाचे जलपुजन माने यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी हा आशीर्वाद मागितला. मेघराज कुचेकर, अनिल खोत, सुजित मोरे, दत्तात्रय शेलार, सतीश मोरे, सुनिल कणके, पळसदेवचे ग्रामस्थ व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इंदापूर तालुका पावसाच्या बाबतीत तसा कमनशिबी आहे. सतत दुष्काळ अनुभवणा-या या भागात बहुतेक वेळा परतीचा पाऊस मदतीचा हात देतो. यंदा पावसाने चांगलीच कृपादृष्टी दाखवली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ऑगस्टअखेर पळसदेवचा पाझर तलाव पाण्याने भरला. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच हे घडले.

या पाण्यामुळे पळसदेवसह मराडवाडी व रुई येथील शेतीच्या पाण्याची उणीव दूर होणार आहे. पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.