विशेष

ऑनलाईन शिक्षणात इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची भरारी

 

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येवून शिक्षण घेणे जिकीरचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने परदेशातील नामांकित विद्यापीठातील दर्जेदार अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने मिळवून दिली आहे.

या संदर्भात माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी यांनी सांगितले की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इच्छा असून देखील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येवून शिक्षण घेणे अडचणीचे झाले आहे. उमेदीच्या वर्षांमध्ये त्यांची व पालकवर्गाची शिक्षणाबाबत होत असणारी कुचंबणा लक्षात घेवून, विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेत, जागतिक स्तरावर ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कोर्सेरा या संस्थेसोबत करार केला.

या करारानुसार महाविद्यालयाला तीनशे लायसन्स मोफत मिळाली आहेत. त्याद्वारे विद्यार्थी घरी बसून नामांकित परदेशी विद्यापीठातील दर्जेदार अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, कोर्सेरा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर पायथन, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज असे कौशल्य विकासावर भर देणारे ३५०पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थाना त्या विद्यापीठांची प्रमाणपत्रे पूर्णतः मोफत मिळत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात, शैक्षणिक संस्था बंद असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत विद्यार्थानी  ८५० पेक्षा जास्त प्रमाणपत्र मिळवलेली आहेत. ग्रामीण भागातील पारंपरिक महाविद्यालयातून एवढया मोठ्या संख्येने नामांकित परदेशी विद्यापीठांची प्रमाणपत्रे मिळवणे हा एक विक्रमच असू शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द व परिश्रमाच्या जोरावर काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

कोर्सेरावरचे अभ्यासक्रम विद्यार्थाना कौशल्य मिळवून देणारे आहेत. बदलत्या काळास सामोरे जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. अशा प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याने आत्मविश्वास दुणावतो. महाविद्यालयातील प्राध्यापक देखील अशा उपक्रमात सहभागी होऊन स्वतःला अद्ययावत ठेवत आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. साहूजी यांनी केले आहे.

●● विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून महाविद्यालयातर्फे लर्निंग मॅनॅजमेण्ट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्राध्यापकांनी स्वतः विकसित केलेले व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, विविध उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन लेक्चर्स देण्यात येत आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ.साहुजी यांनी दिली.●●

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

13 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

7 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.