विधायक

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना रेनकोटचे वाटप

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
मंचर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक सन्माननीय संजयजी भोकरे, राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथजी जाधव, जिल्हाध्यक्ष सितारामजी लांडगे आणि सर्व जेष्ठ सहकारी आणि सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम राबविण्यात आला.

कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या सोयीने रेनकोटचे वितरण करण्यात आले. तीन टप्प्यात झालेल्या या वितरण कार्यक्रमाची दिनांक ४ सप्टेंबर रोजी सांगता करण्यात आली. सन्माननीय मार्गदर्शक विश्वासराव आरोटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुका कार्यकारिणीने पत्रकारांसाठी नेहमीच विविध कार्यक्रम राबविले असून यापुढेही अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

जगभरात कोविड १९ या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. त्यामुळे सगळीकडे काळजीचे वातावरण पसरले आहे. त्यात पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांपर्यंत बातमी पोहचवण्यासाठी धडपडत असतात. हा संसर्ग रोखण्यासाठी त्यांचेही योगदान मोलाचे आहे. त्यांनाही कोठेतरी संरक्षण मिळाले पाहिजे. या कालावधीत सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. समीर पठाण, जेष्ठ पत्रकार मधुकर गायकवाड, अंकुश भूमकर, समीर गोरडे, मोहसीन काठेवाडी, भानुदास बोऱ्हाडे, मंगेश रत्नाकर, विजय साळवे, ज्ञानेश्वर खिरड आदी उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.