निधन वार्ता

निधन वार्ता : बाळकृष्ण तुकाराम कोतुळकर

महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
आळंदी :
येथील माईर्स एमआयटीच्या संस्थेच्या वर्कशॉप विभागातील फोरमन बाळकृष्ण तुकाराम कोतुळकर ( वय ८० वर्षे ) यांचे आज ( दि. १० ) सकाळी तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बाळकृष्ण कोतुळकर हे गेली ३२ वर्षापासून माईर्स एमआयटीच्या वर्कशॉप विभागात फोरमन म्हणून कार्यरत होते. एमआयटीच्या वर्कशॉप विभागाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १९६५ ते १९८८ पर्यंत फोरमन म्हणून काम केले होते.
माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, माईर्स एमआयटी या शिक्षण संस्थेतील वर्कशॉप विभागाची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. आमच्या संस्थेमध्ये कोतुळकर मास्तर म्हणून विद्यार्थी व कर्मचार्‍यांमध्ये प्रसिद्ध होते. जगातील सर्वात मोठा घुमट, आळंदी व देहू येथे उभारण्यात आलेला घाट व आळंदी येथील गरूड स्तंभ उभारण्याच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यांनी कधीही कुठलीही तक्रार न करता दिलेली सर्व कामे ते व्यवस्थित करत असत. त्यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्यांच्या निधनामुळे संस्थेची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 08 Nov 2026

शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

1 hour ago

MahaBulletin — 07 Nov 2026

गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गौण…

1 day ago

MahaBulletin — 05 Nov 2026

बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ विकास…

3 days ago

MahaBulletin — 03 Nov 2026

सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कुरकुंडी…

5 days ago

MahaBulletin — 02 Nov 2026

रविवार, १ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अदिती…

6 days ago

MahaBulletin — 01 Nov 2026

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वाहतूक…

1 week ago

This website uses cookies.