महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : नऊ वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथील एका अल्पवयीन मुलावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेवून इंदापूर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
पिडित मुलीच्या आईने या संदर्भात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी फिर्यादीच्या पतीने फिर्यादीस चारा आणण्यासाठी नदीकडे सोडून त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले. मुलगी घराजवळच्या शाळेच्या पटांगणात खेळत होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला चारा घेवून घरी आल्या असता घरी मुलगा एकटाच होता. त्याने बहिण शाळेच्या पटांगणात खेळत आहे. तिला आणण्यासाठी वडील तिकडे गेल्याचे फिर्यादीस सांगितले.
थोड्या वेळाने फिर्यादीचे पती मुलीला घेवून घरी आले असता त्यांनी सांगितले की, मुलगी शाळेच्या पटांगणात खेळत असताना आरोपीने तेथे येवून तिच्या हाताला धरुन आपल्या घरी नेले. तिच्यावर अतिप्रसंग केला. घरी आल्यानंतर ती मुलगी पोटात दुखत आहे, असे म्हणून मोठ्याने रडू लागली. फिर्यादीने तिला धीर देवून काय घडले विचारले असता, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी हात धरुन त्याच्या घरात नेत असताना, आपण हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आपणास मारले व घरात नेवून अतिप्रसंग केल्याची माहिती दिली.
लोकलज्जेस्तव आपण शांत राहिलो होतो. मात्र प्रसंग गंभीर असल्याने तक्रार देण्यास आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. फौजदार सुशील लोंढे याबाबत अधिक तपास करत आहेत.
——–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.