गुन्हेगारी

नारायणगाव येथे बालाजी ट्रॅक्टर शोरूमच्या मालकाने ग्राहकाला लोखंडी पाईपने केली मारहाण शोरूमच्या मालकासह भावाला अटक

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
नारायणगाव : येथे पुणे नाशिक हायवेलगत असलेल्या बालाजी ट्रॅक्टर शोरूममध्ये ट्रॅक्टरचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला शोरूम मालकाने व त्याच्या भावाने मारहाण केली. तसेच सोबत आलेल्या नातेवाईकांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

या बाबतची फिर्याद सिद्धार्थ सुरेश मंडलिक ( वय वर्षे २७, रा. बेलसर, ता. जुन्नर, जि. पुणे ) यांनी दिली. याप्रकरणी
बालाजी ट्रॅक्टर शोरूमचे मालक संतोष भुजबळ व योगेश भुजबळ यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि.२६/०९/२०२० रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ सुरेश मंडलिक यांनी फिर्याद दिली की, मी तसेच माझे चुलते तुकाराम, चुलती मुक्ता, चुलत भाऊ प्रसाद यांच्यासह नारायणगाव येथे बालाजी ट्रॅक्टर शोरूम येथे आमचे स्वराज कंपनीचे ७२४ ऑर्चिड मिनी ट्रॅक्टरचा व्यवहार क्लिअर करण्यासाठी आलो असता शोरूमचे मालक संतोष भुजबळ यांनी आधी पैसे भरा मग व्यवहार क्लिअर करू असे सांगितले. त्यावर चुलते तुकाराम यांनी तुम्ही व्यवहार क्लिअर करून देतो म्हणाला होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला शोरूमच्या बाहेर काढले. आमचे काम करून देत नाही. आम्हाला जा म्हणतो. लंगड्या पांगळ्याचे पैसे खाऊ नका, चांगल्याचे खा, असे म्हणाले असता त्यांना त्याचा राग येऊन संतोष भुजबळ याने तेथे पडलेला लोखंडी पाईप हातात घेतला. त्यामुळे मी मध्ये आलो असता संतोष भुजबळ याने लोखंडी पाईप माझ्या डोक्यात जोरात मारून गंभीर दुखापत केली. तसेच तेथे असलेल्या योगेश भुजबळ याने संतोष भुजबळ याच्या हातातील लोखंडी पाईप घेऊन त्याने माझे पाठीवर, पायावर, हातावर मारहाण करून मला गंभीर दुखापत केली व माझे चुलते तुकाराम व चुलती मुक्ता यांना धक्काबुक्की करून परत इथे यायचे नाही. आला तर मारून टाकीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ दमदाटी केली. म्हणून मंडलिक यांनी भुजबळ यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे .

वरील फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये,गुन्हा रजिस्टर नं. ३१७/२०२० भा.द.वि.कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४,५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार कैलास ढमाले करीत आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

4 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

8 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.