कोरोना

पुणे विभागात 4 लाख 15 हजार 914 कोरोना बाधित रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी…

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे, ( दि.27 सप्टेंबर ) : पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 959 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा :-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 73 हजार 12 रुग्णांपैकी 2 लाख 24 हजार 582 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 82.26 टक्के आहे.

सातारा जिल्हा :-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 609 रुग्णांपैकी 25 हजार 1 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा :-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 812 रुग्णांपैकी 23 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 40 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा :-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 447 रुग्णांपैकी 23 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 267 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 259 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा :-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 34 रुग्णांपैकी 31 हजार 888 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 783 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ :-
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 537 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 180, सातारा जिल्ह्यात 622, सोलापूर जिल्ह्यात 523, सांगली जिल्ह्यात 615 तर कोल्हापूर जिल्ह्यात 597 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण :-
आजपर्यत विभागामध्ये एकुण 18 लाख 20 हजार 844 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 15 हजार 914 नमून्यांचा अहवाल सकारात्मक ( पॉझिटिव्ह ) आहे.
————————–
( टिप :- दि. 26 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार… )

■ पुणे जिल्हा कोरोना अपडेट ■

                     
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.