महाबुलेटीन न्यूज : किरण वाजगे
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात आज ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत आढळलेल्या एकूण १४१३ रुग्णांपैकी ७८४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.
नारायणगाव व ओतूर येथे आज प्रत्येकी १६ कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून शिरोली बुद्रुक येथे सात, आळे येथे चार, वारूळवाडी येथे तीन, डिंगोरे व जुन्नर येथे प्रत्येकी दोन, बल्लाळवाडी, उंब्रज नं. २, पिंपळवंडी, हिवरे बुद्रुक, खोडद, बारव, धामणखेल, कुरण, सावरगाव, बेल्हे, गुळुंचवाडी येथे प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आज कोरोनामुळे ओतूर व शिरोली बुद्रुक येथील दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जुन्नर तालुक्यांमध्ये निश्चितपणे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे असून योग्य कारणासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसात सुमारे २०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जुन्नर तालुक्यात निष्पन्न झाल्यामुळे व एक हजार चारशे पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात आज पर्यंत १४१३ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यातील सुमारे ७८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ५६९ अँक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण ६१ रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…
सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…
This website uses cookies.