महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील ठाकरवस्ती येथे सापळा रचून चाकण पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी पिस्तुल व चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील ( वय २४, रा. नाणेकरवाडी, ता.खेड, जि.पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ५० हजार ८०० रुपये किंमतीची गावठी बनावटीचे दोन पिस्टल, व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्याकडून चाकण व खेड पोलिसांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सुद्धा दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली होती.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, राजू जाधव, संजय जरे, हनुमंत कांबळे, वीरसेन गायकवाड, संदीप सोनवणे, अनिल गोरड, निखिल वर्पे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रदीप राळे, मच्छिन्द्र भांबुरे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे हे करीत आहेत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.