कत्तलीसाठी निघालेली जनावरे चेक पोस्टवर पकडली

महसूल मनपा व पोलीस पथकाची संयुक्त कारवाई, अन्य दहा जण ताब्यात
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
परभणी : संचारबंदी लागू असताना अनधिकृतरित्या जिल्ह्यात प्रवेश करून कोरोनाचा धोका वाढविणाऱ्या दहा जणांना आज बुधवार दिनांक 15 जुलै रोजी पहाटे गंगाखेड रोडवरील चेक पोस्टवर पकडण्यात आले आहे. तसेच एका वाहनातून कत्तलीसाठी नेले जात असलेले गाय व वासरू पथकाने ताब्यात घेतले आहे.  मास्क वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु असून चेकपोस्टवर आठ हजाराचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून चेक पोस्टवर हजर होते.  प्रभारी तहसीलदार मंदार इंदूरकर, मनपाचे सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे, मोटार वाहन निरीक्षक अमोल गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे कोणतीही परवानगी नसताना खाजगी वाहनाद्वारे रात्रभर प्रवास करून उल्हासनगर वरून आलेले आठ जण व पुण्याहून आलेले दोन जण अशा दहा जणांना पथकाने ताब्यात घेतले.
या व्यक्तींना  ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालयात  दाखल केले. तर काहींना सोनपेठ येथे विलगिकरणात ठेवले जाणार आहे. वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेणार असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. कुंडेटकर यांनी महाबुलेटीनशी बोलताना सांगितले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

8 hours ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

3 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

5 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

This website uses cookies.