विधायक

मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर

मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर
● कलाकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची मागणी…

● कलाकारांची परवड थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आर्त हाक…
● पुणेकर यांच्यावतीने लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप…

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे, त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लावणी, सांगीतिक कार्यक्रम तसेच चित्रपट, मालिका निर्मितीमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या अशा हजारो तंत्रज्ञ, कामगारांसारख्या पडद्यामागील कलाकारांचे जगणे लॉकडाउनने मुश्कील झाल्याचे वास्तव आहे. स्पॉटबॉय, सेटिंग बॉय, लाइटमन, ग्रीसमन, साउंड असिस्टंट, साउंड रेकॉर्डीस्ट, कॉश्‍युम असिस्टंट, आर्ट असिस्टंट, मेकअप असिस्टंट, हेअर ड्रेसर यांसारख्या हजारो कष्टकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोनामुळे नाट्यसृष्टीवरही अवकळा पसरली आहे. कलाकारांसोबतच नृत्यकलाकार, तंत्रज्ञ यांच्यावरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक नृत्य कलाकार आणि तंत्रज्ञांनी अन्य मार्गाचा अवलंब करत स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार, नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्ददर्शक, आणि तंत्रज्ञांची ससेहोलपट सुरू आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी हे सर्व कलाकार आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. त्यातच सुरश्री प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही २०० गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप करत असल्याचे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.

यावेळी बाळासाहेब दाभेकर, अशोक पुणेकर, शिवसंग्राम पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, मनोज पुणेकर आदी उपस्थित होते.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.