महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील भैरवनाथ चौकात आळंदी ग्रामस्थांचे वतीने ग्रामदेवता शितळादेवी व श्री गणेश मंदिर जिर्णोद्धार निमित्त श्रींची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचे कलशारोहन निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कु-हाडे पाटील यांनी सांगितले.
दोन दिवशीय धार्मिक उपक्रमात रविवारी (दि.२५) होम हवन व श्रींचे मूर्ती स्थापना, सोमवारी (दि.२६) श्रींचे मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना, मंदिर कलशारोहण, सायंकाळी सात वाजता आळंदी ग्रामस्थ भजनी मंडळ यांचे वतीने भजन सेवा होणार आहे.
कलशारोहण शांतीब्रम्ह गुरुवर्य ह.भ.प. मारुती महाराज कुऱ्हेकर यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, खेडचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी उपाध्यक्ष व नगरसेवक सागर बोरुंदिया, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टीळक, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील, संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब मोरे, विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिति विश्वस्त अॅड. माधवीताई निगडे, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आळंदीकर ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
००००
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.