महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर ( पुणे ) : कडधे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कीर्तनकार, प्रगतशील शेतकरी व पंढरीची पायी वारी करणारे वारकरी हभप. मणिलालकाका उर्फ मोतीराम स्वामी सावळेराम नाईकडे ( वय ९२ वर्षे ) यांचे आज ( दि. ११ मार्च ) रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय वनसेवेतील आयएफएस रंगनाथ नाईकडे ( मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर वन वृत्त ) यांचे ते वडील होत.
काकांनी जुन्या पिढीत प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी पहिले किर्तन केले. उभ्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत लाखो कीर्तने केली. परंतु संपूर्ण आयुष्यात त्यांनी कोणत्याही कीर्तनाचे मानधन घेतले नाही. ‘विनामूल्य किर्तन सेवा‘ हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. त्यांनी पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक लोक व गावे व्यसनमुक्त केली. ‘काल्याचे कीर्तन‘ हे त्यांचे विशेष होते.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.