गुन्हेगारी

मेदनकरवाडीतून काल बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ, मृतदेहाचा एक पाय गायब

मेदनकरवाडीतून काल बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ, मृतदेहाचा एक पाय गायब

महाबुलेटीन न्यूज

चाकण : मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथून काल बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेचा आज रक्षाबंधनाच्या दिवशी विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला असून मृतदेहाचा कमरेखालचा अवयव एक पाय गायब असून एक पाय पिरगळलेल्या अवस्थेतआढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा सतेन्द्र ठाकूर ( वय वर्षे महिने ) असे मृत बालिकेचे नाव आहे. मृत्यूचेनेमके कारण अद्याप समजले नाही.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, मृत्यू झालेल्या बालिकेची आई नेहा सत्यद्र कुमार ठाकूर (वय२७, सध्या रा. भगतवस्ती, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मुळगाव भोजापूर, ता. भैरिया, जि. बलिया, उत्तर प्रदेश ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक१० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी वाजताच्या सुमारास दोघी बहिणी घरात झोपलेल्या असताना त्यातील रिशू (वय वर्षे महिने) नामक मुलगी कुणाला काहीही सांगत दुपारी च्या सुमारास घराच्या बाहेर पडली. त्यानंतर तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळुननेल्याची फिर्याद मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

त्यानंतर दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांना एका मुलीचा विवस्त्र असेलेला मृतदेह छिन्न विच्छिन्नअवस्थेत दिसून आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी सकाळी ठिक :१५ वाजताच्या दरम्यान मिळून आलेल्या मृतदेहाबद्दल चाकणपोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर तात्काळ चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखलझाले. घटनेचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह शिवविच्छेदनसाठी प्रथम चाकण ग्रामीण रुग्णलयात नेला. मात्र मृतदेहाचा एक पायगायब असून एक पाय पिरगळलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूपूर्वी काही अत्याचार झाला आहे का हे पडताळण्यासाठी मृतदेह पिंपरीयेथील वायसीएम रुग्णालयात फॉरेन्सिक एक्स्पर्टकडे पाठविण्यात आला आहे. वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजूशकणार आहे.

याप्रकरणी काल चाकण पोलीस ठाण्यात भां. . वि. ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

घटनास्थळाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टेयांच्यासह चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक देवडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनीघटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपाससहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड करत आहेत.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.