गुन्हेगारी

मेदनकरवाडीतून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल, माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून रोख बक्षीस जाहीर

मेदनकरवाडीतून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालिकेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल, माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून रोख बक्षीस जाहीर

महाबुलेटीन न्यूज
चाकणमेदनकरवाडी ( ताखेड ) येथून बुधवारी ( दि. १० ऑगस्ट ) रोजी बेपत्ता झालेल्या चार वर्षीय  बालिकेच्या मृतदेहाचे काल उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बालिकेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला असून मृतदेहाचा कमरेखालचा एक अवयव गायब आहे.अतिशय निर्दयीपणे हा खून करण्यात आला असून आरोपीला शोधण्यासाठी पोलीसपथके रवाना झाली आहेत. कृष्णा सतेन्द्र ठाकूर ( वय  वर्षे  महिने ) असे मृत बालिकेचे नाव आहेखुनाचे नेमके कारण अद्याप समजले नाही

या प्रकरणी चाकण पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२७३/२०२२ भा.दं.वि. कलम ३६३, ३०२ प्रमाणे दि. ११/०८/२०२२ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयात एका लहान निष्पाप निरागस मुलीचा निघृणपणे अमानवीरित्या खुन करण्यात आलेला आहे. सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सदरची लहान मुलगी ही साधारणता साडेचार वर्षाची असून तीसुमारे चार दिवसापुर्वी भगतवस्ती, मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे राहण्याकरीता परप्रांतातुन तिचे आई वडीलांसोबतआलेली होती. ती दिनांक १०//२०२२ रोजी दुपारी ०२.१५ वा. चे सुमारास भगतवस्ती, मेदनकरवाडी चाकण येथून बेपत्ता झालेली होती. दिनांक ११//२०२२ रोजी सकाळी ०९.०० वा. बेपत्ता झालेल्या ठिकाणापासुनच जवळच मेदनकरवाडी येथील गवते यांचे शेतामध्ये मयत मिळून आलेली आहे.

सदर लहान मुलीस दिनांक १०//२०२२ रोजी दुपारी .१५ वाजले नंतर कोणा सोबत कोणी पाहीले असल्यास अथवा सदर घटनेबाबत काही माहीती असल्यास संबधीतांनी सदरची माहीती खालील नमुद मोबाईल नंबरवर कळवावी. सदरची माहीती देणारे व्यक्तीचे नावगुप्त ठेवण्यात येईल तसेच माहीती देणायास योग्य ते रोख बक्षिस देण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपर्क क्रमांक :- पदमाकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड, मो.नं. 9823563640

राम राजमाने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट , पिंपरी चिंचवड, मो. नं. 7875144771

वैभव शिंगारे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड मो.नं. 8689807776

विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट , पिं.चिं. मो.नं. 9763004858

सचिन मोरे, पोलीस हवालदार गु. शा. युनिट , पिं.चिं. मो.नं. 9850901942

राजकुमार हनमंते पोलिस शिपाई गु. शा. युनिट पिं.चिं. मो.नं. 9834490418

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.