महाबुलेटिन न्युज/तुषार वहिले
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह रुग संख्या वाढत आहे, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मावळात जवळपास १५०० च्या वर रुग्णांचा आकडा झाला आहे. यात ५०० च्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. काही बरे झाले आहेत, तर काहींचे उपचार सुरू आहे.
मावळात काही जण लक्षणे जाणवल्यास खाजगी दवाखान्यात जाऊन तपासणी करतात. पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ करत गुपचूप उपचार घेत आहेत. यात काही राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आहेत. मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांची मात्र भीतीने गाळण उडाली आहे. वास्तविक संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी म्हणून पहिले सूचित करणे अपेक्षित आहे; मात्र तसे होत नाही.
याउलट….
मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे हे देखील कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह सापडले असून कुठल्याही खाजगी दवाखान्यात न जाता शासकीय वैद्यकीय सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहेत. सर्व संपर्कात आलेल्यांना खबरदारी म्हणून आपापले अहवाल तपासून घ्यावयास सांगितले आहेत. सामान्य नागरिकांना घाबरून न जाता शासनाच्या कोविड सेंटर मध्ये उपचार करावे, असे आवाहन देखील केले.
दरम्यान, कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी मावळात रहदारीच्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे, तसेच दुकाने आस्थापना यांच्यावर वेळेचे बंधन घालावे, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांकडून होत आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.