पुणे जिल्हा

माजी सभापतींचे आभाराचे दोन शब्द….!

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :

नमस्कार,
मी, अंकुश सुदाम राक्षे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

खेड तालुक्यातील तमाम जनतेचे आशीर्वाद आणि तरुणांच्या साथीच्या जीवावर मी महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती म्हणून आपल्या खेड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा सांभाळली.

ऐन कोरोनाच्या काळात या पदाची जबाबदारी माझ्यावर आल्याने मी देखील तितक्याच तळमळीने माझ्या तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडले. मग दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, जेव्हा फोन येईल, तेव्हा सेवेचे ठाई तत्पर म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न केला.
या शिवाय पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विधायक विकासकामे व समाजाला ज्या विकास कामांची गरज आहे ती तत्परतेने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले.

आदरणीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आणि माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या सूचनेनुसार इतर सर्व सहकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून दिलेला शब्द पाळून मी सभापती पदाचा राजीनामा दिला. ऐन कोरोनाच्या संकटात निसर्ग चक्री वादळचा फटका तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला होता यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्यक्ष घरी जाऊन मदत मिळवून दिली.

सी. एस. आर. फंडच्या माध्यमातून दूरदृष्टी ठेवून म्हाळुंगे येथे जवळ जवळ 1500 बेड असलेले कोव्हीड सेंटर, तसेच चांडोली येथे ग्रामीण रुग्णालयात 45 ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली.

कोरोनामुळे दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत होती, वारंवार कंपन्यांकडे पाठपुरावा करून ventilater ऑक्सिजन बेड, पीपीइ किट, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमिटर, फॅन, लाईट बल्ब, वॉटर हिटर, थर्मल स्कॅनर, खुर्च्या, गरम पाण्याचे मशीन हे सर्व साहित्य उपलब्ध केले.

हे सर्व काम करत असताना प्रशासन, ज्यामध्ये तत्कालीन कलेक्टर नवल किशोर राम, सध्याचे कलेक्टर राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, बी. डी. ओ. अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे, तसेच सर्व महसूल विभाग व पंचायत समिती अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावात बाहेर गावातून आलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था, रस्त्यावरून गावाकडे जाणाऱ्या मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय त्यांना जाण्यासाठी वाहनांची सोय ही व्यवस्था केली होती.

तालुक्यातील 1,60,000 हुन अधिक कुटुंबांना csr फंडाच्या माध्यमातून किराणा किट वाटण्यात आले. गरजू लोकांना दररोज जेवण वाटण्यात आले.

“पद येतं, पद जातं; पण त्या पदाचा वापर करून केलेलं कार्य कायम जिवंत राहतं.” कमी वयात मिळालेल्या संधीचं सोनं करत मी माझं कर्तव्य समजून जनसेवा केली. यापुढील काळात भविष्यात पद नसलं तरी तालुक्यातील कोणत्याही सहकाऱ्याने मला हक्काने फोन करावा आणि काम सांगावं ते काम पूर्ण करण्याची हमी मी तुम्हाला देतो.

आपलाच
श्री. अंकुश सुदाम राक्षे
( मा. सभापती पंचायत समिती खेड )

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.