महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेने आळंदी शहराची नवीन पाणी पुरवठा योजना (कुरुळी टॅपिंग) अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेने भरावयाचा १०% स्वहिस्याची रक्कम पुणे महानगरपालिकेने भरण्याची शासनाचे धोरणा प्रमाणे तात्काळ भरावी, अशी मागणीआळंदी नगरपरीषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी पुणे महानगरपालीकेस केली.
यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी प्रकल्प किंमतीच्या १० टक्के रक्कम म्हणजेच ५५ लाख रुपये स्वहिस्सा महापालिके मार्फत भरण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी कार्यवाही करण्याबाबत सुचना आदेश संबंधित खात्याला दिले आहेत. याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, उपाध्यक्षा मीरा पाचुंदे, माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे यांनी महापौरांना विनंती करून स्वहिस्सा भरण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यास तयारी दर्शवली. नगराध्यक्षा उमरगेकर यांचा पुणे महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.