महाबुलेटीन न्यूज । किशोर कराळे
मुंबई : बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी बैलगाडा शर्यत प्रेमींकडून तसेच अनेक राजकीय पक्षांकडून वारंवार होत आहे. मात्र मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारच्या या याचिकेवर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. येत्या सोमवारी या संदर्भात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भागातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे. तमिळनाडूमधील ‘जल्लिकट्टू’ या बैलांच्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागांत बैलगाडी-बैलगाडा शर्यती होण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करून त्याविषयीच्या नियमांचा मसूदा तयार केला आहे.
तसेच राज्यातील विविध भागांत दिवाळी दरम्यान बैलगाडा शर्यतीचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शर्यतींवरील बंदी पुढच्या काही आठवड्यांसाठी कायम ठेवल्याने यंदाच्या दिवाळी दरम्यान राज्यात शर्यती होऊ शकल्या नव्हत्या. आता सर्वोच्च न्यायालय या बंदीवर काय प्रतिक्रिया देतं आणि ही बंदी उठवली जाते का? आणि पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.