आरोग्य

महाळूंगे गावची सुकन्या सौ. स्नेहा महाळुंगकर ( मिसाळ ) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदान… गावातून प्रथमचडॉक्टरेट पदवी प्राप्त स्तनाचा व त्वचेचा कर्करोग यावर संशोधन करून नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मिळवली डॉक्टरेट

महाळूंगे गावची सुकन्या सौ. स्नेहा महाळुंगकर ( मिसाळ ) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्रदानगावातून प्रथमचडॉक्टरेट पदवी प्राप्त
स्तनाचा त्वचेचा कर्करोग यावर संशोधन करून नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मिळवली डॉक्टरेट

महाबुलेटीन न्यूज l हनुमंत देवकर

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे गावची सुकन्या स्नेहा महाळुंगकर / मिसाळ हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून स्तनाचा कर्करोग त्वचेचा कर्करोग ( ब्रेस्ट कॅन्सर आणि स्किन कॅन्सर ) यावर संशोधन करून नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी प्राप्त केली आहे.

डॉ. स्नेहा या चाकण एमआयडीसीतील उदयोजक आनंद महाळुंगकर यांच्या जेष्ठ कन्या असून त्यांनी मूलभूत भौतिक शास्त्रातील नॅनोटेक्नॉलॉजी अंतर्गत कर्करोगामधील स्तनाच्या आणि त्वचेच्या उपचारासंबंधीचे संशोधन केले. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून औषधांचाप्रभावी वापर कँसर पेशींना मारण्यासाठी केला, हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. स्नेहा या एम. एस्सी. ( बायोटेक ), एम. फिल. असून पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र या विभागात संशोधन करतात.

स्नेहा यांनी मॉर्डन कॉलेजबायो टेकनोलॉजीडीपार्टमेन्ट मध्ये वर्ष असिस्टंट प्रोफेसर ( Asst. Professor ) म्हणून सेवा करतअसताना एम. फिल आणि पीएचडी. ( PHD ) करण्याचा निर्णय घेतला आणि संशोधन विभागात कार्यरत झाल्या.

त्यांनी बेसिक मेडिकल सायन्स मध्ये पीएचडी पूर्ण केले.

प्रोफेसर सुरेश गोसावी ( डायरेक्टर ऑफ स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक सायन्स, सावित्रीबाई फूले युनिव्हर्सिटी ) यांच्या मार्गदर्शनाखाली नॅनोटेक्नॉलॉजी ( Nanotechnology ) मध्ये टारगेट ड्रग डिलिव्हरी startegy वापरून ब्रेस्ट कॅन्सर आणि स्किन कॅन्सर Diagnosis आणि ट्रीटमेंटसाठी त्यांनी अमेरिकेत ( USA ) मध्ये एका कॉन्फरन्स मध्ये प्रेझेन्ट केले. त्यासाठी त्यांना Virginia Commonwealth University, Richmond, तर्फेबेस्ट पोस्टर अवॉर्डमिळाले.

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स कडून Damble अवॉर्ड 2018 फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स ( interdisciplinary Sciences ) तसेच DST Awsar 3.0 अवॉर्ड 2020 फॉर बेस्ट स्टोरी under PHD Category entitled Expedition of curcumin in hunting down Tumors असे अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.

त्यांच्या ह्या यशाचं श्रेय त्या आई सविता, वडील आनंदराव, पती प्रशांत, मुलगा श्रवण तसेच महाळुंगकर आणि मिसाळ कुंटूबाला देतात.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.