महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रावण मासानिमित्त श्री हरिविजयकथासार ग्रंथाचे पूजन थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तापकीर यांचे हस्ते करण्यात आले.
मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावण महिन्यानिमित्त श्री हरिविजय कथासार ग्रंथाचे वाचन केले जात आहे. या वाचनाचे नेतृत्वह.भ.प. साहेबराव शेळके महाराज करीत आहेत. विविध धार्मिक कार्यक्रमात पहाटे काकडा, आरती , दुपारी भजन, नित्य नेमाने हरिपाठ, हरिविजय ग्रंथाचे वाचन व संध्याकाळी श्रींची माऊलींची आणि श्री पांडुरंगरायांची आरती नंतर भाविकांना श्रींचे दर्शन व्यवस्था करण्यातआली आहे. प्रथापरंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम महिनाभर होणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरातआयोजित कार्यक्रमात ह.भ.प. साहेबराव शेळके महाराज यांचा सत्कार शाल, श्रीफळ, उपरणे देऊन ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर यांचेहस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प. रमेश महाराज घोंगडे यांचेसह भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.