राष्ट्रीय

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पिंपरी-चिंचवडच्या डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ साठी नामांकन

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पिंपरी-चिंचवडच्या
डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ साठी नामांकन

महाबुलेटीन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी तसेच सर्वांगिण व्यक्तिमत्व विकासासाठी राज्यात अग्रेसरपणे सामाजिक काम करणा-या ‘मानिनी फाऊंडेशनच्या’ संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

डॉ. भारती चव्हाण यांचे महिला सक्षमीकरण तसेच कामगार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आहे. कोरोना कोविड-19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘ॲन्टी कोरोना टास्क फोर्स’ (एसीटीएफ) या राष्ट्रीय पातळीवर काम करणा-या सामाजिक संस्थेच्या त्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा आहेत. तसेच राज्यातील गुणवंत कामगार कल्याण परिषदेच्या माध्यमातून अध्यक्षा डॉ. चव्हाण यांनी गुणवंत कामगारांचे संघटन उभारले व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. पिंपरीतील कै. आण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा ही कामगार कल्याण मंडळाच्या मालकीची होती. मागील 27 वर्षांपूर्वी हा भुखंड पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. त्याच्या बदल्यात कामगार कल्याण मंडळाला पर्यायी भुखंड देणार होते. हा 27 वर्षांपुर्वीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात डॉ. भारती चव्हाण यांना यश आले आहे. पिंपरी अजमेरा कॉलनी येथील भुखंड कामगार कल्याण मंडळास देण्याबाबतचा ठराव नूकताच मंजूर झाला आहे.

लॉकडाऊन काळात डॉ. भारती चव्हाण यांची एसीटीएफच्या महाराष्ट्र – गोवा अध्यक्ष व राज्यप्रमुखपदी संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र चौधरी यांनी नियुक्ती केली. अल्पावधीतच डॉ. चव्हाण यांनी राज्यभरातील मानिनी फाऊंडेशनच्या सर्व महिलांना बरोबर घेऊन आपल्या नेतृत्व व संघटन कौशल्याने एसीटीएफचे कार्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गाव खेड्यात पोहचविले. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर एसीटीएफच्या माध्यमातून गोवा राज्यासह महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात जसे की, ठाणे, पालघर, मावळ, चंद्रपूर, धुळे, नंदूरबार, नांदेड जिल्ह्यांतील आदिवासी पाड्यापर्यंत स्वयंसेवकांमार्फत जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण, मास्क, वैद्यकीय मदत, सॅनिटायझर, सॅनिटरी नॅपकीन अशी मदत पोहचविली.

लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद असताना राज्य सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. ह्या निर्णयास महिला भगिनींचा तीव्र विरोध असल्यामुळे डॉ. चव्हाण यांनी एसीटीएफच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे दारु विक्री बंद करण्याबाबत पत्राव्दारे मागणी केली. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे लघुउद्योजक व घरगुती वीज ग्राहकांना तीन महिण्याचे वीज बील माफ करावे. याबाबत वीज मंत्री व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. तसेच लॉकडाऊन काळात शेतमजूर, अंध, दिव्यांग तसेच बेघर आणि स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी महत्वपुर्ण भुमिका बजावली. डॉ. भारती चव्हाण यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यातील नेतृत्वगुण, संपर्क व संघटन कौशल्य, जिद्द, चिकाटी विचारात घेऊन त्यांच्यावर एसीटीएफच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांचा सामाजिक कार्याचा आलेख आणखीच उंचावत गेला. त्यांच्या या कार्याचे देशभर कौतुक होऊ लागले आहे. डॉ. भारती चव्हाण यांचे ‘पद्म भुषण’ पुरस्कारासाठी नामांकन झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या कामगार क्षेत्रात व महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
——–

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.