महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून आपणही समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून व कोरोनाच्या लढाईत रूग्णालयामधील डाॅक्टर, नर्स, हाॅस्पीटल कर्मचारी या सर्वांच्या सुरक्षितेसाठी दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठानचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हुतात्मा राजगुरु समाजभूषण मामासाहेब शिंदे यांच्या 92 व्या वाढदिवसाचा खर्च टाळून व आंबेठाणचे माजी सरपंच दत्तात्रय भेगडे यांच्या संकल्पनेतून दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने एकूण 70,000/- रु. ची मदत इनलॅक्स व बुधरानी हाॅस्पीटल पुणे यांना 50 पीपीई कीट्स चे वाटप करण्यात आले.
तसेच चाकण ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन खेड तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व महाळुंगे इंगळे येथे म्हाडाच्या गृहप्रकल्पात नुकतेच सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला N95 मास्क, प्लॅस्टीक शील्ड, गाॅगल्स, हॅण्डग्लोज, शूज कव्हर सह PPE कीट्स – 18 सेट तसेच 200 ML हॅण्ड सॅनिटायझरच्या 100 बाॅटल देण्यात आल्या.
दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामराव पवार, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब भोपे, दत्तात्रय अण्णा गोरे, प्रशांत गोलांडे, महेंद्र कांबळे, संजय बोथरा, शांताराम कानपिळे, लायन्स क्लबचे विलास मांजरे, भरत जाधव, जीवनशेठ सोनवणे, सचिन खोले, नाझीम सिकीलकर, अमित औटी यांनी गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्याधिकारी बळीराम गाढवे, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती भगवान पोखरकर तसेच डाॅ. माधव कनकवले यांच्याकडे सर्व साहित्य सुपूर्द केले.
यावेळी कोरोनाच्या लढाईत अविरतपणे सेवा देणा-या डाॅक्टर, परिचारिका, मदतनीस कर्मचारी यांच्या सुरक्षितेसाठी दिलेल्या मदतीबद्दल दुर्गाई ह्रदय प्रतिष्ठानचे मामा शिंदे यांचे तसेच सर्व दुर्गाई मित्र परिवाराचे पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे व तालुका आरोग्याधिकारी यांनी आभार मानले.
तसेच गेल्या 13 वर्षापासून प्रतिष्ठान खेड तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात मोफत ह्रदय विकार तपासणी शिबीर हे इनलॅक्स व बुधरानी हाॅस्पीटल पुणे यांच्या सहकार्याने घेत असल्यामुळे त्यांच्याही विनंतीस मान देऊन प्रतिष्ठानने 50 PPE कीट्सची मदत दत्तात्रय भेगडे, सचिन खोले, सुदेश बिडवे, प्रकाश मिंडे, अविनाश सोनावणे, मीना शिंदे, सीमा शिंदे, संजय शिंदे, अंकुश डोंगरे, महेश सोनावणे ई. च्या सहकार्याने मदत देण्यात आली. या कोरोनाच्या लढाईत सर्व दुर्गाई मित्र परिवाराने आर्थिक मदत केल्याबद्दल सर्वांचे मामा शिंदे यांनी आभार मानले.
—–
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.