महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ७० कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात १८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राजगुरूनगर व चाकणला सर्वाधिक रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात तब्बल ४१ रुग्णांची भर पडली आहे. चाकण, निघोजे, शेलपिंपळगाव व सोळू मधील प्रत्येकी एक असा चार रुग्णांचा रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २२४९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४१ ) : राजगुरूनगर – १३, चाकण – १५, आळंदी – १,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २९ ) : खराबवाडी ५, वडगाव घेनंद ५, रासे ४, चांडोली ३, दावडी ३, मेदनकरवाडी ३, सांडभोरवाडी २, आंबेठाण २, भोसे २, दौंडकरवाडी २, तर ढोरे भांबुरवाडी, होलेवाडी, वडगाव पाटोळे, कोहिंडे बुद्रुक, वाफगाव, येलवाडी, निघोजे, भांबोली, मोई, सोळु या १० गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ७०
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २२४९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३५२
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १८३८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १३, चाकण १५.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०४ ( १ पुरुष, वय ३०, रा. चाकण, १ पुरुष, वय ५६, रा. निघोजे, १ महिला, वय ८०, रा. शेलपिंपळगाव, १ महिला, वय ८०, रा. सोळु )
——————
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.