महाबुलेटीन न्यूज
मंचर : पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य व केळगावचे मा. सरपंच सोमनाथ मुंगसे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या कार्यकर्त्यांनी लांडेवाडी ता. आंबेगाव येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवबंधन बांधून सोमनाथ मुंगसे व सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत सहर्ष स्वागत करण्यात आले, अशी माहिती माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
यावेळी आढळराव म्हणाले, “आमदार सुरेशभाऊ गोरे यांची इच्छा असलेली खेड पंचायत समितीची प्रशासकीय इमारत आहे त्याच जागेत करण्यासाठी आपण सर्व एकदिलाने प्रयत्न करीत आहोत. शिवसेना पक्षवाढीचे व सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. सोमनाथ मुंगसे हे प्रथितयश उद्योजक असून तालुक्यातील नागरिकांच्या हितासाठी येथील लोकांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंबीर नेतृत्व आपल्या सोबत असून पद असो वा नसो विकास कामांमध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही.”
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व केळगावचे मा. सरंपच सोमनाथ मुंगसे, किरण मुंगसे, नामदेव मुंगसे, संदीप गुंड, लक्ष्मण मुंगसे, राहुल विरकर, विशाल मुंगसे, तुकाराम भांडवलकर तसेच मनसेचे चाकण शहराध्यक्ष ऋषीकेश वाव्हाळ, राकेश केदारी विश्वास गंभीर, चिन्मय वाव्हळ, आकाश गंभीर, अमोल ढमाले, अक्षय आरूडे आदींचा सत्कार करून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोकराव खांडेभराड, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, महिला आघाडी संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, शिवसेना खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद गटनेते देवीदास दरेकर, युवासेना विस्तारक सचिन बांगर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पुणे जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर, स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष नितीन गोरे, शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरूण गिरे, मा. उपसभापती ज्योती अरगडे, उपतालुकाप्रमुख संजय घनवट, उपतालुकाप्रमुख किरण गवारे, युवा नेते विजय शिंदे, संरक्षण कक्षाचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, धिरज केळकर, अतुल गोरे, ॠषीकेश शेवकरी, शैलेश गोरे, संदीप घनवट, सुदाम बोत्रे, राहुल मलघे, श्रीनाथ लांडे, संदिप घनवट, पप्पु राक्षे, रोहिदास राक्षे आदी उपस्थित होते.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.