महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या खेड तालुका अध्यक्षपदी आदर्श शिक्षक तान्हाजी महाळुंगकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाची तालुका सहविचार सभा शिक्षक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यामध्ये शिक्षक संघाची ध्येय-धोरणे, शिक्षकांचे विविध प्रश्न या विषयी साधक-बाधक चर्चा करण्यात आली. त्यानंतर सध्याच्या कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे राज्य संघाचे उपाध्यक्ष राजेश कांबळे, जिल्हा संघाचे प्रतिनिधी बाळासाहेब दुंडे, दत्ताभाऊ राक्षे, राजेंद्र गारगोटे यांच्या समवेत नुतन कार्यकारणी निवडीबाबत चर्चा करण्यात येवून सर्वांच्या संमतीने तीन वर्षासाठी बिनविरोध कार्यकारणीची निवड करण्यात आली.
■ बिनविरोध कार्यकारणी पुढीलप्रमाणे :-
___________________________
● अध्यक्ष – तान्हाजी महाळुंगकर,
● सरचिटणीस – काळुराम ठाकुर,
● कार्याध्यक्ष – रामचंद्र शिंगाडे,
● कोषाध्यक्ष – नवनाथ ढोकले,
● प्रवक्ते – संदिप मिरजे व अरूण गायकवाड,
● संपर्क प्रमुख – संजय घुमटकर व सत्यवान गाडे,
● प्रसिध्दी प्रमुख – दत्तात्रय बोडरे व विशाल शिंदे,
● कार्या. चिटणीस – गणेश दरवडे, नितीन आडवळे
● उपाध्यक्ष – रोहीदास येळवंडे, आत्माराम शिंदे, सोमनाथ पाचपुते, ज्ञानेश्वर मोकाशी, अमोल घेनंद, तान्हाजी चौधरी व
राम केदारी
● विभाग प्रमुख – विजय दाभाडे, काळुराम डावरे, महेंद्र पवार, अरविंद शिंदे, योगेश क्षिरसागर, महेश कोबल व विश्वास राळे
● सहचिटणीस – अशोक सातपुते, तुकाराम शिंदे, हरीष हजारे, नितिन सुरकुले, प्रताप राळे, भरत चिंचकर, प्रविण घोडे व अशोक सोनवणे
● सल्लागार – संदिप नाणेकर, तुकाराम कुटे, विनोद बोराटे, सुनिल वाघ, ज्ञानेश्वर कडलग, महादु राळे व देविदास नेहेरे
● मार्गदर्शक – गौतम कांबळे, बजरंग सुपे, सत्यवान शितोळे, भरत लोखंडे, श्रीराम मिंडे, कैलास लोखंडे, अनिल तिटकारे व वनराज कहाणे
यावेळी शिक्षक नेते विठ्ठलराव तांबे, शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुखदेव मुंगसे, उपसभापती कैलास कुटे, सरचिटणीस राहूल लोखंडे, केंद्रप्रमुख प्रतिनिधी भरत लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.