निवड/नियुक्ती

डावरे पाटलांच्या शिरपेचात मानाचा तुरा.. खेड तालुका ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी विनोद डावरे पाटील यांची निवड

डावरे पाटलांच्या शिरपेचात मानाचा तुरा..
खेड तालुका ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी विनोद डावरे पाटील यांची निवड

महाबुलेटीन न्यूज : निरंजन गाळव 
कोरेगाव बुद्रुक ( ता. खेड ) येथील युवा कार्यकर्ते श्री. विनोद डावरे पाटील यांची खेड तालुका ग्राहक हक्क संघर्ष समिती अध्यक्ष पदी निवड झाली आहे. 

अनेक सामाजिक कार्यात त्यांच्या पुढाकार असल्यामुळे त्यांना ही संधी प्राप्त झाली आहे. अनेक सामाजिक कामे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्तरावर मार्गी लावली आहेत. जनतेच्या अडचणी समजून घेणे त्यांच्या सोबत चर्चा करणे मार्ग काढण्यासाठी काय करता येईल याच्यावर सल्ले घेणे आणि पुढे त्या विषयाचा पाठपुरावा करणे.संबंधित अधिकाऱ्यांना भेटून जो पर्यंत विषय मार्गी लागत नाही तो पर्यंत विषयाचा मागोवा घेणे ही त्यांची कार्यशैली.

सामाजिक कार्याची आवड आणि जनतेच्या अडचणी समजून घेण्याचा वारसा त्यांना त्यांचे आजोबा माजी पोलीस पाटील कै. जयवंतराव बाळाजी डावरे पाटील यांच्याकडून लाभला आहे. त्यांनी ५० वर्ष कोरेगावचे पोलीस पाटील पद भूषवले आणि जनतेला आधार दिला. पुढे हा वारसा जपत त्यांचे वडील कै. रामचंद्र जयवंतराव डावरे पाटील यांनी कायम ठेवला.

वडील स्वर्गवाशी झाल्यानंतर त्यांच्या आई श्रीमती मिना रामचंद्र डावरे पाटील यांनी देखील गावात विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेरमन पद सांभाळले असून सध्या त्या कोरेगाव बु।। विविध कार्यकारी सोसायटीवर विद्यमान संचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. पुढे जाऊन विनोद रामचंद्र डावरे पाटील यांनी त्यांच्या सामाजिक कार्याने कोरेगाव बु।। मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आणि आता त्यांना त्याचे फळ मिळाले.

तालुकास्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यांचे असे मत आहे की, एवढ्या मोठ्या पदामुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. तेवढ्याच जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन देखील भेटले आहे. लहान, तरुण, थोर मंडळींकडून सर्व स्तरांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या कामाला गती प्राप्त व्हावी यासाठी ग्राहक हक्क संघर्ष समिती पुणे शहर अध्यक्ष श्री. आनंद राजहंस यांनी पुढाकार घेतला आणि त्यांना ही जबाबदारी दिली. भविष्यात मोठी कामे मार्गी लावत असताना राजकिय दबाव किंवा अडीअडचणी आल्या तर समिती कायद्याच्या माध्यमातून अधिकारीक स्तरापासून ते उच्च न्यायालयापर्यंत साथ देईल, असे राजहंस यांनी महाबुलेटीनशी बोलताना सांगितले. समितीमध्ये सर्व क्षेत्रातील कुशल कायदेतज्ज्ञ मंडळी कार्यरत आहेत.
——–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.