पुणे जिल्हा

तळेगावकर नागरिकांना दिलासा : कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक मंजूर… ● तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक : उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे ● तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा सादर केलेला अर्थसंकल्प हा आभासी : विरोधी पक्षनेते गणेश काकडे

 

महाबुलेटीन न्यूज : मिलींद अच्युत
तळेगाव दाभाडे : आगामी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अर्थसंकल्प ( बजेट ) नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात मंजूर करण्यात आला. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजता विशेष सभेस सुरवात झाली. मात्र गणपूर्ती अभावी दोन वेळा सभा तहकूब करावी लागली. नंतर सभा पुढे सुरु झाली. 

यावेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, रोहित लांघे, निखिल भगत, नगरसेविका शोभा भेगडे, अनिता पवार, हेमलता खळदे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, संध्या भेगडे, मंगल जाधव, प्राची हेंद्रे, काजल गटे, संगीता शेळके आदी उपस्थित होते.

लेखापाल अजित खरात यांनी सभगृहापुढे अंदाजपत्रक ठेवले. विशेष सभेस विविध विकास कामांवरील खर्च, महसुली आणि भांडवली जमा – खर्चाचा तपशील सभागृहापुढे ठेवण्यात आला. मात्र कोणत्याही विषयावर विशेष चर्चा न होता अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

कोणतीही करवाढ नसलेला २२० कोटी १९ लाख ४७ हजार
५०० रूपये खर्चाचा आणि २८ लाख ६५ हजार ८६१ रूपये शिलकीचा अर्थसंकल्प सभागृहात मंजूर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात प्रारंभिक शिल्लक ८१ कोटी २३ लाख ७१ हजार ५३९ रूपये दाखविण्यात आली आहे. महसुली आणि भांडवली अशी एकूण जमा रक्कम १९९ कोटी ७७ लाख १९ हजार ५०० रुपये इतकी आहे. प्रारंभिक शिल्लकेसह एकूण २२० कोटी ४८लाख १३ हजार ३६१ रूपये जमेची तरतूद त्यात करण्यात आली आहे.

या अंदाजपत्रकाचे सत्ताधारी पक्षाने स्वागत केले, तर विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी मात्र अंदाजपत्रकावर सडकून टीका केली. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत अंदाजपत्रकावर दिलेल्या उपसुचनेचे काय झाले? असा प्रश्न
विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी सुरुवातीस उपस्थित केला. मात्र नगराध्यक्षा जगनाडे यांनी उपसुचनेस अनुमोदक नसल्याने
ती उपसुचना नाकारली असे सांगितले.

नंतर गणेश काकडे अधिक आक्रमक झाले. शहरवासियांच्या
दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणीपट्टीच्या दंड आणि व्याजाचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनास बेजार केले. २०१६-१७ आणि २०१७-१८ ची पाणीपट्टी बील नगरपरिषद प्रशासना कडून नागरीकांना वेळेत न गेल्याने नागरीकांना भोगाव्या लागणाऱ्या आर्थिक फटक्यास जबाबदार कोण? हा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांच्या माथी मारण्याचे पाप करू नका, असे खडेबोल प्रशासनास सुनावले. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी बजेटच्या १ टक्के रक्कम राखीव ठेवण्याची मागणी गणेश काकडे यांनी यावेळी केली. या रास्त मागणीचा स्वीकार करून आपत्ती व्यवस्थापनसाठी सभागृहाने २ कोटी रुपयांची वाढीव तरतूद सुचवली आहे.

सभा कामकाज दीर्घकाळ चालणार हे लक्षात येताच उपनगराध्यक्ष सैंदाणे यांनी सभागृहाची सूत्रे आपल्याकडे घेतली. नंतर सैंदाणे यांनी अंदाज पत्रकाबाबत सविस्तर माहिती दिली. नगरपरिषदेतील वास्तव परिस्थिती सांगताना सुशील सैंदाणे म्हणाले, “जवळपास एक महिन्यापासून नगरपरिषदेस मुख्याधिकारी नाहीत. मुख्याधिकारी नसलेली नगरपरिषद हे चित्र गौरवास्पद नाही. राज्य शासनाने त्वरित निर्णय घेऊन या नगरपालिकेस मुख्याधिकारी लवकरात लवकर द्यावा. अन्यथा विकासकामे मार्गी लागणार नाहीत. नगर परिषदेचे कामकाज ठप्प होईल. हे आपणा सर्वांना परवडणारे नाही”. यावेळी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी 
———————–
भांडवली जमा
● शाळा बांधकाम १० कोटी,
● शिवशंभो स्मारक ३ कोटी,
● नगरपालिका इमारत बांधकामासाठी ६ कोटी,

◆ महसुली खर्च
● पाच टक्के दुर्बल घटक
२ कोटी २५ लाख
● दिव्यांग कल्याणकारी योजना
२ कोटी ६० लाख
● महिला व बालकल्याण
२ कोटी ६० लाख

◆ भांडवली खर्च
● पाणी व भूयारीगटर योजना ४५ कोटी
● प्रधान मंत्री आवास योजना १ कोटी

◆ ऐतिहासिक वास्तू
● संग्रहालय ५० लाख 
● सर्पमित्र २६ लाख
● व्यायाम शाळा साहित्य १ कोटी
———————————

सुशील सैंदाणे

■ तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आहे. यात कोणतीही करवाढ व दरवाढ केलेली नाही. सर्वसाान्यनागरिक आणि शहराचा विकास केंद्रबिंदूमानून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामुळे तळेगावकर नागरिकांना दिलासा मिळण्यास मदतच होणार आहे.
— सुशील सैंदाणे
उपनगराध्यक्ष : तळेगाव दाभाडे नगरपरिषद
_________________________

 

गणेश काकडे

■ तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा सादर केलेला अर्थसंकल्प
हा आभासी आहे. वास्तवाला धरून नाही. अवाजवी आणि
फुगवटा असलेल्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा नाही. हाअर्थसंकल्प म्हणजे शहराच्या विकासाच्या दृष्टीने ताकद नसून ती सूज आहे.
— गणेश काकडे
विरोधी पक्षनेते : तळेगाव दाभाडे नगरपरिषद
————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

14 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.