महाबुलेटीन न्यूज
आळंदी : श्री संत गुरु रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती समस्त हराळे वैष्णव चर्मकार समाज धर्मशाळेच्या मंदिर सभागृहात कोरोना महामारीचे सावट असल्याने सर्व सरकारी नियमांचे पालन करुन मोजक्याच पदाधिकारी, समाज बांधवांचे उपस्थितीत साधेपणाने श्रीचे पूजन करून संत रोहिदास महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन व दिपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.
कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष मल्हार काळे, खेड तालुका मनसेचे अध्यक्ष प्रसाद बोराटे, भाजपाचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, संघटनेचे सल्लागार महादेव पाखरे, विश्वनाथ नेटके, शिवाजी गवळी, मारुती पाचारणे, लक्ष्मण नेटके, संदीपान घायाळ, राजु कांबळे, विकास नेटके, विकास गरुड यांचेसह मोजकेच समाज बांधव उपस्थित होते. राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष तुकाराम नेटके यांनी आभार मानले . कार्यक्रमाचे संयोजन हराळे वैष्णव चर्मकार समाज धर्मशाळेचे विश्वस्त व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक अध्यक्ष तुषार नेटके यांनी केले. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
—–
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.