महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेसाठी शिवसेनेचे भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, सुनीता सांडभोर, वैशाली जाधव, सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, मच्छीन्द्र गावडे हे आठ, राष्ट्रवादीचे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे हे चार, तर काँग्रेसचे अमोल पवार व भाजपचे चांगदेव शिवेकर असे एकूण १४ सदस्य उपस्थित होते.
राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या शिवछत्रपती सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली. सभापती पदासाठी एकूण दोन अर्ज आले होते. त्यामध्ये शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांचा अर्ज जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे बाद झाल्याने चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती अरुण चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे प्रभारी सभापती चांगदेव शिवेकर, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सभापती रामदास ठाकूर, माजी जि प सदस्य अरुण चांभारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, मयूर मोहिते, उमेश गाडे, सुभाष होले, हेमलता टाकळकर, सर्व पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार मोहिते यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर खरमरीत टीका केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने जास्तीत जास्त सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सूतोवाच केले.
आमदार मोहिते पाटील म्हणाले, “भगवान पोखरकर हे सभापती होण्यासाठी माझ्या पाया पडले होते; मात्र त्यांनी विश्वासघात केला. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ते सध्या तुरुंगात असून माझ्या हत्येचा कट रचत आहेत, अशी मला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर खटला भरणार आहे.”
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ५०० मीटर परीघ परिसरात वाहतूक बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तसेच आज पंचायत समिती वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी शेवटचा दिवस असतानाही निवडणुकीमुळे येथे प्रवेश बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली. आता त्यासाठी मुदत वाढवून मिळेल काय असा सवाल नागरिकांकडून होत आहे.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.